VIDEO : रशियाच्या मिसाइल हल्ल्यात शासकीय इमारत उद्ध्वस्त-Russia Ukraine War

| Updated on: Mar 01, 2022 | 1:19 PM

युक्रेनच्या कीव शहरासोबतच खारकीवला रशियन सैन्यानं टार्गेट केलं आहे. हल्ल्याचे थरकाप उडवणारे नवनवे व्हिडीओ समोर येत आहेत. अशातच रस्त्याच्या मधोमध मिसाईनलं हल्ला करण्यात आल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. मंगळवारी हा हल्ला करण्यात आला.

युक्रेनच्या कीव शहरासोबतच खारकीवला रशियन सैन्यानं टार्गेट केलं आहे. हल्ल्याचे थरकाप उडवणारे नवनवे व्हिडीओ समोर येत आहेत. अशातच रस्त्याच्या मधोमध मिसाईनलं हल्ला करण्यात आल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. मंगळवारी हा हल्ला करण्यात आला. सकाळच्या सुमारास करण्यात आलेल्या या हल्ल्याची घटना अंगावर काटा आणणारी होती. या हल्ल्यात मोठं नुकसान झालंय. काही गाड्या रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. युद्धामुळे फारशी वाहतूक नसली तर काही जण वाहनांमधून प्रवास करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. एका कार पुढे सरकत असतानाच अचानक रस्त्याच्या मधोमध मिसाईल डागण्यात आलेल. यानंतर मोठा स्फोट झाला. आगीचा भडका उडालाय.

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 1 March 2022
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1PM | 1 March 2022