Amchya Pappani Ganpati Anala फेम चिमुकला साईराज केंद्रे tv9 मराठीवर, बघा काय मारल्या गप्पा?

Amchya Pappani Ganpati Anala फेम चिमुकला साईराज केंद्रे tv9 मराठीवर, बघा काय मारल्या गप्पा?

| Updated on: Sep 01, 2023 | 9:36 PM

VIDEO | "आमच्या पप्पांनी आणला गणपती" या गाण्यातील परळी तालुक्यातील कन्हेरवाडीतील ४ वर्षाचा चिमुकला साईराज केंद्रे हा चेहऱ्यावरील हावभावामुळे याचा सोशल मिडियावर व्हिडिओ चांगलाच गाजतोय

बीड, १ सप्टेंबर २०२३ | “आमच्या पप्पांनी आणला गणपती” या गाण्यावर परळी तालुक्यातील कन्हेरवाडीच्या एल.के.जीमध्ये शिकणाऱ्या साईराज गणेश केंद्रे या चार वर्षाच्या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील हावभाव सोशल माध्यमावर रिल्सच्या रूपात व्हिडिओ चांगलाच गाजतोय. हा व्हिडिओ 6 लाख 66 हजार लोकांनी शेअर केला असून त्याला 2.5 मिलियन लोकांनी लाईक केले आहे. परळी-अंबाजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी हे गाव आहे. या गावात गणेश केंद्रे राहत असून ते अंबाजोगाई येथील एका खाजगी एजन्सीवर काम करतात त्यांच्या चार वर्षीय साईराज या मुलाला गाण्यानुसार हावभावची दीड वर्षाचा असल्यापासून आवड आहे, दीड वर्षाचा असताना आई मला पावसात जाऊ दे हा व्हिडिओ लोकप्रिय झाला होता. त्यानंतर साईराज हा कन्हेरवाडी येथील माऊली अनुराधा देवी इंग्लिश स्कूलमध्ये एल.के.जी चे शिक्षण घेत आहे. शाळेत जात असताना आमच्या पप्पानी आणला गणपती.. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती… या गाण्यावर साईराजची रिल्स तयार करून वडील गणेश केंद्रे यांनी इंस्टाग्रामवर टाकली. पहाता पाहता साईराज इंस्टाग्राम वर हिट झाला. गाण्यानुसार केलेल्या हावभावाचे लोक कौतुक करत आहेत. साईराज च्या केलेला आई साईराज केंद्रे भाग्यश्री व वडील गणेश केंद्रे हे प्रोत्साहन देत आहेत.

Published on: Sep 01, 2023 09:36 PM