सलीम कुत्ताची हत्या 25 वर्षापूर्वीच; काँग्रेस आमदाराचा नवा दावा अन् पुन्हा राजकारणात खळबळ
सुधाकर बडगुजर यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले होते. सुधाकर बडगुजर हे सलीम कुत्तासोबत पार्टीत सहभागी झाल्याचे राणे म्हणाले. मात्र आता काँग्रेस आमदाराने नवीनच दावा केला आहे. सलीम कुत्ता याची १९९८ मध्येच रुग्णालयात हत्या झाली होती.
नागपूर, १८ डिसेंबर २०२३ : दोन दिवसांपूर्वी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले होते. सुधाकर बडगुजर हे सलीम कुत्तासोबत पार्टीत सहभागी झाल्याचे राणे म्हणाले. मात्र आता काँग्रेस आमदाराने नवीनच दावा केला आहे. सलीम कुत्ता याची १९९८ मध्येच रुग्णालयात हत्या झाली होती. रोहित वर्मा, रवी पुजारी आणि संतोष शेट्टी या लोकांनी सलीम कुत्ता याचा मर्डर केला आहे, असा दावा काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याला यांनी विधानभवन परिसरात केला अन् राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. तर सलीम सलीम कुत्ता याला तीन बायका आहेत. त्याच्या तिन्ही बायकांनी कोर्टात असे सांगितलं की, आमचा नवऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याची जी संपत्ती सीज केली ती सरकारने परत द्यावी. या तीन बायकांच्या दाव्यानुसार, न्यायालयाने जप्त केलेली संपती सलीम कुत्ताच्या कुटुंबीयांना दिली आहे, अशी माहितीही कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे.

'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?

एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका

विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?

'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
