Salman Khan | अभिनेता सलमान खानची अहमदाबादमध्ये गांधीगिरी, ऐतिहासिक साबरमती आश्रमाला भेट

Salman Khan | अभिनेता सलमान खानची अहमदाबादमध्ये गांधीगिरी, ऐतिहासिक साबरमती आश्रमाला भेट

| Updated on: Nov 29, 2021 | 5:29 PM

बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने आज महात्मा गांधीं यांच्या ऐतिहासिक साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी सलमानने चक्क बापूंचा चरखाही चालवला.

बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने आज महात्मा गांधीं यांच्या ऐतिहासिक साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी सलमानने चक्क बापूंचा चरखाही चालवला. लाडक्या ‘भाईजान’चा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यावेळी सलमानने हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. आश्रमाला भेट देऊन निघताना सलमानने व्हिजिटर बुकमध्ये आपला अभिप्राय लिहिला. त्याने लिहिले की, ‘मला इथे यायला खूप आवडले आणि हा आनंद मी कधीच विसरणार नाही. मला पहिल्यांदाच अशा ठिकाणी फिरायला मिळाले आहे. मला या आश्रमात पुन्हा यायला आवडेल.’

‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अहमदाबादला आलेल्या सलमानची एक झलक पाहण्यासाठी आश्रमातही त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. सलमान केवळ 10 ते 15 मिनिटे साबरमती नदीच्या काठावरील ‘साबरमती’ आश्रमात थांबला होता. स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य केंद्र असलेल्या या ऐतिहासिक ठिकाणी वसलेले महात्मा गांधीजींचे निवासस्थान असलेले ‘हृदय कुंज’लाही त्याने यावेळी भेट दिली.