Video : 'झंडू बाम घेऊन ठेवा, झोप उडवल्याशिवाय राहणार नाही' शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीवरुन टीका करणाऱ्या बावनकुळेंना सुनावलं!

Video : ‘झंडू बाम घेऊन ठेवा, झोप उडवल्याशिवाय राहणार नाही’ शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीवरुन टीका करणाऱ्या बावनकुळेंना सुनावलं!

| Updated on: Aug 28, 2022 | 7:10 AM

म्हाला संभाजी ब्रिगेडची एवढी भीती का वाटते? लोकांच्या न्याय हक्कासाठी जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरुन भांडू तेव्हा तुमच्या जातीवादी विचारांचा आणि मनुवादी विचारांचा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही, असं विधान त्यांनी केलं आहे.

चंद्रशेखर बावनुकुळे (Chandashekhar Bawankule) यांनी केलेल्या टीकेला संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना आणि संभाजी बिग्रेडची (Shiv sena Sambhaji Brigade Alliance) युती म्हणजे फुसका बार असल्याची टीका भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. तर बावनकुळेंना पोटशूल का उठलंय, असा सवाल करत संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी निशाणा साधलाय. तुम्हाला संभाजी ब्रिगेडची एवढी भीती का वाटते? लोकांच्या न्याय हक्कासाठी जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरुन भांडू तेव्हा तुमच्या जातीवादी विचारांचा आणि मनुवादी विचारांचा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही, असं विधान त्यांनी केलं आहे. झंडू बाम घेऊन ठेवा, तुमची झोप उडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय.

Published on: Aug 28, 2022 07:10 AM