गौतमी पाटीलबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे म्हटले…
VIDEO | डान्सर गौतमी पाटील प्रकरणावर संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया
जळगाव : प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील हिच्या अडनावावर काही मराठा संघटनांनी आक्षेप नोंदवल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान, स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘ सर्व महिलांना स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे. सर्वांनी महिलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कलाकार म्हणून गौतमी पाटील हिच्या पाठीशीही उभं राहिलं पाहिजे’, असे म्हणत त्यांनी गौतमी पाटील हिच्या कलेचं समर्थन केल्याचे पाहायला मिळाले. महिलांनी आपले गुण आणि कर्तृत्व दाखविले, हे सांगत असतांना संभाजीराजे यांनी इतिहासातील महाराणी ताराबाई यांचं उदाहरण दिलं. महाराणी ताराराणी यांनी ७ वर्षे औरंगजेबाशी लढा दिला, तेव्हापासून महिला सबलीकरण तेव्हापासून सुरु झालं आहे. शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिलं आहे. कलाकरांना संरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी आहे, असेही संभाजीराजे म्हणाले.