Kirit Somaiya यांचं INS विक्रांत प्रकरण नेमकं काय?
आयएनएस विक्रांत तर भंगारात गेली. त्यावेळी 57 कोटी रुपये अशी ही रक्कम सांगण्यात आली होती. प्रत्यक्षात 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम किरीट सोमय्या यांनी स्वतःच्या घशात घातली, हा देशद्रोहाचा गुन्हा आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. या गुन्ह्याची चौकशी का केली जाऊ नये, असा सवालही राऊत यांनी केला.
मुंबई | भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी देशद्रोहासारखा गुन्हा केल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मालमत्तेवर ईडीने काल टाच आणल्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील वाद आणखीच चिघळत चालला असून राऊत यांनी आज किरीट सोमय्या यांचा आणखी एक घोटाळा आज बाहेर काढला. 2013-14 आणि 2014-15 साली देशाच्या संरक्षण दलाचा अभिमान असलेली आयएनएस विक्रांत(INS Vikrant) भंगारात काढण्याची तयारी सुरु होती. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी भाजपाचा झेंडा घेऊन सेव्ह विक्रांत नावाने मोहिम सुरु केली. लाखो-करोडो मुंबईकरांकडून कोट्यवधी रुपये जमा केले. मात्र या रकमेचे पुढे काय झाले? आयएनएस विक्रांत तर भंगारात गेली. त्यावेळी 57 कोटी रुपये अशी ही रक्कम सांगण्यात आली होती. प्रत्यक्षात 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम किरीट सोमय्या यांनी स्वतःच्या घशात घातली, हा देशद्रोहाचा गुन्हा आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. या गुन्ह्याची चौकशी का केली जाऊ नये, असा सवालही राऊत यांनी केला.