‘आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत’, संजय राऊतांचा दादांना टोला

अजित पवार यांची काल सांगलीतील तासगाव येथे सभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर मोठे आणि गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. यावरून अजित पवार यांनी टोला लगावला आहे.

'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत', संजय राऊतांचा दादांना टोला
| Updated on: Oct 30, 2024 | 2:40 PM

अजित पवार यांनी काल एक खळबळजनक वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. आर.आर.पाटील यांनी आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.  “आबांचे केस लहान होते. ते कसाने गळा कापू शकत नाही. ते प्रामाणिक, कर्तबगार गृहमंत्री होते. त्यांनी गृहमंत्री म्हणून कधी चुकीच काम केलं नाही” असं संजय राऊत म्हणाले. आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. पुढे राऊत असेही म्हणाले की, अत्यंत प्रामाणिक, कर्तबगार असे या राज्याचे आर आर आबा पाटील हे गृहमंत्री होते. त्यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणून कधीच चुकीचं काम केलं नाही, असं आम्हाला वाटत नाही, असं संजय राऊत म्हणाले. तर अजित पवारांनी काल आर आर आबा पाटील यांनी जी सही केली ती दाखवली, चौकशीचे आदेश देण्याची सही जर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दाखवली असले तर तो गोपनियतेचा भंग आहे. अशा पद्धतीने गोपनियतेचा भंग करणे हा फार मोठा गुन्हा आहे. त्यामुळे राज्यपालांनी या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला पाहिजे, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

Follow us
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला.
अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ
अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ.
36 तासांनंतर वनगा रिचेबल, पत्नी म्हणाल्या, 'मध्यरात्री तीन वाजता...',
36 तासांनंतर वनगा रिचेबल, पत्नी म्हणाल्या, 'मध्यरात्री तीन वाजता...',.
शिंदेंकडून हेलिकॉप्टरने AB फॉर्म,देवळाली-दिंडोरीमध्ये महायुतीत बंडखोरी
शिंदेंकडून हेलिकॉप्टरने AB फॉर्म,देवळाली-दिंडोरीमध्ये महायुतीत बंडखोरी.
सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’
सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’.
लोकसभेच्या मिमिक्रीचं विधानसभेला उत्तर, पवारांनी केली दादांची मिमिक्री
लोकसभेच्या मिमिक्रीचं विधानसभेला उत्तर, पवारांनी केली दादांची मिमिक्री.
अजितदादांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट
अजितदादांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट.
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?.
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास..
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास...
'त्या' फाईलवर आबांची सही, दादांचे आरोप; मुलगा रोहित पाटील म्हणला....
'त्या' फाईलवर आबांची सही, दादांचे आरोप; मुलगा रोहित पाटील म्हणला.....