‘शिंदेंना त्या विमानातून उतरवलंय, आता ते ट्रेनचे….’, एकनाथ शिंदेंना संजय राऊतांनी डिवचलं, बघा काय म्हणाले?
अमरावतीमध्ये काल विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील हजर होते.
विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ झालं त्यावेळी मी विमानाचा पायलट मी होतो. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे को पायलट होते, असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. इतकंच नाहीतर आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पायलट आहे आणि मी आणि अजित पवार को पायलट आहे. पायलटची सीट बदलली मात्र त्याच गतीने विकासाचं विमान पुढे जात असल्याचे एकनाथ शिंदे म्हणालेत. दरम्यान, नुकत्याच झालेल्या अमरावती विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. तर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पलटवार करत एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे. ‘एकनाथ शिंदे यांना त्या विमानातून आता उतरवलंय… आता ते ट्रेनचे लोको पायलट आहेत’, असं संजय राऊत म्हणाले.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

