Sanjay Raut : २०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका
२०१४ पासून भाजपने काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती. त्याच काँग्रेसने, काँग्रेसच्या राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे यांनी काँग्रेसमुक्त घोषणा करणाऱ्यांना घाम फोडल्याचे संजय राऊत म्हणाले. तर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही राऊतांनी निशाणा साधला
मुंबई, १ डिसेंबर २०२३ : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे मतदान ३० नोव्हेंबर रोजी पार पडले. या निवडणुकीचे ३ डिसेंबर रोजी निकाल हाती येणार आहेत. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज गुरुवारी जाहीर झाले. विविध संस्थांनी अंदाज व्यक्त करत एक्झिट पोल जाहीर केला. यावरून संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. २०१४ पासून भाजपने काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती. त्याच काँग्रेसने, काँग्रेसच्या राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे यांनी काँग्रेसमुक्त घोषणा करणाऱ्यांना घाम फोडल्याचे संजय राऊत म्हणाले. तर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही राऊतांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मोदींना ८-८ दिवस एका राज्यात राहावं लागतंय, गृहमंत्र्यांना अख्खा देश वाऱ्यावर सोडून प्रचार करावा लागतोय. हे काँग्रेसमुक्त भारतच लक्षण नसून २०२४ पासून भारताला भाजपपासून मुक्ती मिळणार आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय.