Sanjay Raut : भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत, एकनाथ शिंदे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊत यांनी घेरलं
VIDEO | मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेतली. यावेळी शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असेल तोपर्यंत मराठ्यांसाठी लढणार असल्याचे ते म्हणाले. यावर राऊतांनी प्रतिक्रिया देत टीका केली. शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ते शिवसेनेत राहणार होते. आता शिवसेनेत आहेत का?
मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेतली. यावेळी शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असेल तोपर्यंत मराठा समाजासाठी लढणार असल्याचे शिंदे म्हणाले. यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. राऊत म्हणाले, ‘भाजपच्या सहवासात आल्यापासून खोट्या शपथा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१४ साली शिवरायांचा आशीर्वाद मोदींच्या सोबत.. असे म्हटले होते. तेव्हापासून शिवरायांच्या नावाचा वापर राजकारणात होतोय. शपथा कसल्या घेताय. बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी करायची. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं हे काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्कम महाराष्ट्राला तडा देण्याचं काम हे करत आहेत. भाजपच्या इशाऱ्यावर हे सर्व काही सुरूये. स्वतःचा आचार-विचार नाही. काही दिवसांनी हे डोक्यावरती काळी टोपी घालून फिरतील’, असा टोला राऊतांनी लगावला. तर शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब आणि श्वास असेपर्यंत ते शिवसेनेत राहणार असं शिंदे म्हणाले होते. ते आता शिवसेनेत राहिलेत का? जनता पक्ष आमच्यावरती छळ करते त्यामुळे जाहीर सभेत राजीनामा देणारे हे आज भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत, असेही राऊत म्हणाले.