छगन भुजबळ यांची वक्तव्य ही समाजात फूट पाडणारी अन् आग लावणारी, कुणी साधला निशाणा?

छगन भुजबळ यांची वक्तव्य ही समाजात फूट पाडणारी अन् आग लावणारी, कुणी साधला निशाणा?

| Updated on: Oct 15, 2023 | 12:35 PM

VIDEO | मंत्री छगन भुजबळ यांची वक्तव्य ही समाजात फूट पाडणारी आहे इतकंच नाही तर ती वक्तव्य आग लावणारी आहेत तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून फक्त राजकारण सुरू असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केलाय.

मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३ | मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तर छगन भुजबळ यांची वक्तव्य महाराष्ट्रातील समाजात, जाती, घटकात फूट पाडणारी आहे आणि आग लावणारी असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये मराठा समाजाला आरक्षण देणार होते मग का दिलं नाही? असा रोखठोक सवाल देखील संजय राऊत यांनी भुजबळ यांना विचारला आहे. इतकंच नाही तर आरक्षणाच्या मु्दद्यावरून फक्त राजकारण सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलाय.

Published on: Oct 15, 2023 12:34 PM