जिथे राजकीय फायदा तिथे...., पंतप्रधान मोदी यांच्यावर संजय राऊत यांचा घणाघात

जिथे राजकीय फायदा तिथे…., पंतप्रधान मोदी यांच्यावर संजय राऊत यांचा घणाघात

| Updated on: Jan 19, 2024 | 11:15 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. जिथे राजकीय फायदा आहे, तिथेच पंतप्रधान जातात. त्यांना व्यापक राष्ट्रहित, जनहित याबाबत त्यांना आणि त्यांच्या पक्षाला काहीही पडलेले नाही, असे म्हणत राऊतांनी खोचक टीका केली आहे.

मुंबई, १९ जानेवारी २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात सोलापूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. जिथे राजकीय फायदा आहे, तिथेच पंतप्रधान जातात. त्यांना व्यापक राष्ट्रहित, जनहित याबाबत त्यांना आणि त्यांच्या पक्षाला काहीही पडलेले नाही, असे म्हणत राऊतांनी खोचक टीका केली आहे. पुढे ते असेही म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जवळपास ८५ जागा आहेत. त्यानंतर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. त्यामुळे या दोनच राज्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जास्त लक्ष आहे. मोदींनी मणिपूरला गेलं पाहिजे, काश्मीर खोऱ्यात गेलं पाहिजे. तसेच त्यांनी म्यानमारच्या सीमेवर, लडाखला जायला पाहिजे.’, असा खोचक सल्लाही राऊत यांनी मोदींना अप्रत्यक्षरित्या दिला. लक्षद्वीपला जाऊन वेळ घालवला आणि मालदिवशी भांडण केलं हे देखील राजकारण असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावरही टोला लगावला आहे.

Published on: Jan 19, 2024 11:15 AM