तुरुंगातून सुटल्यानंतर संजय राऊत पहिल्यांदाच राहुल गांधी यांना भेटले; भेट होताच दोघांची गळाभेट
भारत जोडो यात्रेतील राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या गळाभेटीचा हा फोटो सोशल मिडियावर चांगलाच होतोय व्हायरल
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे जम्मूमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. आज पहाटेच संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आपला सहभाग दर्शविला. यात्रेत सहभागी होताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संजय राऊत यांची गळाभेट घेतली आणि त्यांचे यात्रेत स्वागत केले.
भारत जोडो यात्रेतील राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या गळाभेटीचा हा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. संजय राऊत या यात्रेनंतर शिख समुदायाची भेट घेणार आहेत. तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील शिष्टमंडळाची देखील भेट घेणार आहेत. यासंदर्भातील माहिती संजय राऊत यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे. तर आजच्या सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखात भाजप राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने डचमळला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
Published on: Jan 20, 2023 01:31 PM
Latest Videos