राज्यात मोगलाई सुरू, राज्य मोदींचं की औरंगजेबाचं? संजय राऊत यांचा कुणावर रोख?
संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे. यावरूनच संजय राऊत चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. ईडीची विरोधकांना ईडीची नोटीस पाठवणं ही सगळी भाजपच्या हुकुमशाहीविरोधात लढणारी लोकं असल्याचे त्यांनी म्हटलंय
मुंबई, २५ जानेवारी २०२४ : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर काल त्यांची तब्बल १२ तास चौकशी झाली तर आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी होणार आहे. यासह आमदार रविंद्र वायकर आणि संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे. यावरूनच संजय राऊत चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. ईडीची विरोधकांना ईडीची नोटीस पाठवणं ही सगळी भाजपच्या हुकुमशाहीविरोधात लढणारी लोकं आहेत. दोन-पाच लाखांच्या व्यवहारासाठी नोटीस पाठवल्या जात आहे. जे हजारो कोटींचे घोटाळे करून देश बुडवून पळून गेले त्यांच्यावर कोणाचे लक्षनाही. संदीप राऊत यांना नोटीस आल्याचे मला माहिती असून याचं कारण हास्यास्पद असल्याचे राऊतांनी म्हटले तर राज्यात मोगलाई चालू आहे की, मोदींचे राज्य औरंगजेबाचे आहे? असा सवालही त्यांनी केलाय.