Sanjay Raut : आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर, तरुणांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळतोय, संजय राऊतांची प्रतिक्रिया
'आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांना ठाण्यात प्रचंड प्रतिसाद मिलाला. भिवंडी, कर्जतमध्येही त्यांचं जल्लोषात स्वागत झालं. जिकडे जातात तिकडे त्यांना तरुणांचा उत्सफूर्त प्रतिसाद. आम्ही शिवसेनेच्या सोबतच राहू,'
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thacekray) यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांना ठाण्यात प्रचंड प्रतिसाद मिलाला. भिवंडी, कर्जतमध्येही त्यांचं जल्लोषात स्वागत झालं. जिकडे जातात तिकडे त्यांना तरुणांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळतोय. आम्ही शिवसेनेच्या सोबतच राहू, असं आश्वासन शिवसैनिक देत आहेत. घोषणा देत आहेत. भविष्यातही महाराष्ट्राचं वातावरण असंच शिवसेनामय झाल्याचं दिसेल, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या विजयावरही प्रतिक्रिया दिली आहेय. ‘देशाच्या राष्ट्रपतीपदावर द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या आहेत. त्यांना देशभरातून मोठं मतदान झालं. त्यात शिवसेनेचाही (Shivsena) खारीचा वाटा आहे. देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. त्या संविधानाच्या चौकीदार आहेत. त्यांनी संविधानाचं रक्षण करावं. दलित आदिवासींना न्याय देण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे.’