मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाची सीट धोक्यात? संजय राऊत यांचा दावा काय?
संजय राऊत यांनी दिलं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान
जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्व्हे असतात तेव्हा त्यांना हवे असतात. राष्ट्रीय स्तरावरचा सर्व्हे भाजपच्या बाजूने आहे, तो त्यांना हवा आहे. पण महाराष्ट्रातला सर्व्हे त्यांच्या विरोधातील आहे. तो त्यांना नकोय. त्या सर्व्हेनुसार, लोकसभेच्या महाविकास आघाडीला साधारण 34 जागा मिळतील असा अंदाज आहे. पण आम्ही म्हणतो या जागा 40 ते 45 असतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
यासह राऊत असेही म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणाले 4 ते 5 जागा मिळवल्या तरी पुरे पण माझे असे म्हणणे आहे की, एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली येथील जागा वाचवली तरी पुरे, असे विधान करत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना थेट आव्हानच दिले आहे. सी व्होटर सर्व्हे आल्यानंतर लोकसभा निवडणुकीत मविओला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र हा सर्व्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. मविआच्या 4 ते 5 जागा निवडून आल्या तरी पुरे अशा शब्दांत त्यांनी आघाडीवर निशाणा साधला होता.