नाना पटोले महत्त्वाची व्यक्ती, त्यांनी फार गांभीर्याने घेऊ नये; संजय राऊतांचा सल्ला

नाना पटोले महत्त्वाची व्यक्ती, त्यांनी फार गांभीर्याने घेऊ नये; संजय राऊतांचा सल्ला

| Updated on: Jul 13, 2021 | 11:13 AM

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं.

मुंबई: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाना पटोले हे महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यक्ती आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीचा सुरक्षेचा अहवाल सरकारकडे जातच असतो. त्यामुळे नानांनी फार गांभीर्याने घेऊ नये, असा सल्ला संजय राऊत यांनी नानांना दिला.