तर नारायण राणे तिहार जेलमध्ये जातील, संजय राऊत यांचा इशारा काय?
नारायण राणे यांच्या वक्तव्यावर पलटवार करत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 'दोन महिन्यात आमची सत्ता येतेय. त्यांच्या ईडी, सीबीआयने फायली बंद केल्या त्या ओपन केल्या तर राणे तिहारमध्ये जातील.', असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी नारायण राणेंना दिलंय.
कोरोना काळात पैसे खाल्ले आता बाप-बेटे जेलमध्ये जाणार, असं वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं आणि नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. सीआयडी वैगरे वेगळी राणेंची यंत्रणा वेगळी आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्यावर पलटवार करत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. ‘दोन महिन्यात आमची सत्ता येतेय. त्यांच्या ईडी, सीबीआयने फायली बंद केल्या त्या ओपन केल्या तर राणे तिहारमध्ये जातील.’, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी नारायण राणेंना दिलं. तर ‘आपली सत्ता आल्यावर राणे साहेबांना तिहार जेलमध्ये घालण्याची भाषा करणाऱ्या मुंजेरी लाल के हसीन सपने पाहणाऱ्या संजय राऊत यांनी राणे साहेब आणि भाजपच्या नेत्यांची चिंता करू नये करण पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार आणि मोदी पंतप्रधान होत आहेत’, असे म्हणत नितेश राणेंनी हल्लाबोल केलाय.