Uddhav Thackeray यांच्या उपस्थितीवर टीका करणारे नामर्द, Sanjay Raut यांचं पडळकरांना प्रत्युत्तर- Tv9

Uddhav Thackeray यांच्या उपस्थितीवर टीका करणारे नामर्द, Sanjay Raut यांचं पडळकरांना प्रत्युत्तर- Tv9

| Updated on: Jan 26, 2022 | 8:58 PM

मुख्यमंत्री सक्रिय झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. आज त्यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केलं. त्यानंतर शिवाजी पार्कवरील (shivaji park)  ध्वजारोहणाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली. मुख्यमंत्री सक्रिय झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आजारी होते. त्यामुळे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेत होते. या काळात विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. विरोधक मुख्यमंत्र्यांवर भावनाशून्यपणे टीका करत होते. ते कोणत्याही प्रकारच्या राजकीय नितिमत्तेला धरून नव्हते. विरोधकांच्या या नामर्दपणाला महाराष्ट्रातील जनतेनेच सडेतोड उत्तर दिलं आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी विरोधकांची चांगलीच पिसे काढली.

Published on: Jan 26, 2022 08:58 PM