बाप-बेटे जेलमध्ये जाणार- Sanjay Raut यांचा Kirit Somaiya यांना इशारा
आर्यन खान प्रकरणाचं सत्यबाहेर आलं आहे. तुम्ही किती मोठं अवडंबर तयार केलं होतं. शाहरुखचा मुलगा म्हणून, मोठं नाव म्हणून तुम्ही अवडंबर तयार केलं. बनाव केला. आमच्याबाबतीतही तेच केलं. आता मी आलोय. तुम्ही तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही पराजित होणार आहात, असं संजय राऊत म्हणाले.
आर्यन खानचा (aryan khan) ड्रग्स प्रकरणात काहीच संबंध नसल्याचं उघड आलं आहे. या प्रकरणाचं सत्यबाहेर आलं आहे. या प्रकरणात बनाव केला गेला होता. तपास यंत्रणांचा दुरुपयोग नव्हता तर काय होतं? असं सांगतनाच आर्यन प्रकरणात जसा बनाव केला तसाच बनाव आमच्या प्रकरणात केला गेला आहे. आतापर्यंत मी यात पडलो नव्हतो. आता मी समोर आलो आहे. आता तुमच्या प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय मी राहणार नाही. तुम्हाला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझे शब्द लिहून ठेवा. आय रिपीट मेक माय वर्ड, असा इशाराच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी दिला आहे. तसेच बाप-बेटे तुरुंगात जाणारच आहेत. तुम्ही घोटाळा केला नाही तर मग अटकपूर्व जामिनासाठी का धडपड करत आहात?, असा सवालच राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना नाव न घेता केला. ते मीडियाशी बोलत होते.
आर्यन खान प्रकरणाचं सत्यबाहेर आलं आहे. तुम्ही किती मोठं अवडंबर तयार केलं होतं. शाहरुखचा मुलगा म्हणून, मोठं नाव म्हणून तुम्ही अवडंबर तयार केलं. बनाव केला. आमच्याबाबतीतही तेच केलं. आता मी आलोय. तुम्ही तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही पराजित होणार आहात, असं संजय राऊत म्हणाले.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....