नालायक लोकांना ‘तो’ शब्द वापरला पाहिजे, शिवसेना नेत्याचा ठाकरे अन् राऊत यांच्यावर पलटवार काय?
... असा माणूस राज्याचा कारभार करण्यासाठी नालायक आहे. अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता. या टीकेवरूनच शिवसेना नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार पलटवार केलाय
छत्रपती संभाजीनगर, २९ नोव्हेंबर २०२३ : जो माणूस स्वतःच्या घराची काळजी न करता बेपर्वाहीने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो, असा माणूस राज्याचा कारभार करण्यासाठी नालायक आहे. अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता. या टीकेवरूनच शिवसेना नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना नालायक या शब्दाचा उल्लेख केला होता आणि या शब्दाचे संजय राऊत यांनी देखील समर्थन केले आहे. इतकंच नाही तर नालायक या शब्दाला शिवी म्हणता येणार नाही किंवा ती टीका देखील नाही. तो चांगला शब्द आहे, असे संशोधन या नालायक माणसांनी केल्याचे म्हणत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.