Walmik Karad : वाल्मिक कराड फिल्म प्रोड्यूसर? निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा अन्..
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि मास्टर माईंड वाल्मिक कराडचा सिनेविश्वाशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे.
वाल्मिक कराड संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबरमध्ये निर्घृण हत्या कऱण्यात आली होती. दरम्यान, चार महिन्यांनंतर या प्रकरणातील आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे. यापूर्वी सरपंच देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे समोर आले होते. तेव्हापासूनच वाल्मिक कराड चांगलाच चर्चेत आला होता. दरम्यान, आता वाल्मिक कराडचे सिनेविश्वाशी संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. यासंदर्भातील एक मोठा दावा बीड मधील सायबर विभागातील निलंबित पोलीस अधिकाऱ्याने केलाय. वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्यूसर होता, असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी हा दावा केलाय. इतकंच नाहीतर सोशल मीडियावर वाल्मिक कराडच्या आयकार्डसह एका आलिशान ऑफिसचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये बीकेसी मधील प्रॉडक्शन ऑफिसचे फोटो आणि आयकार्डचा फोटो दिसत आहे. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचा वाल्मिक कराड अजीवन सभासद असून बीआरजे फिल्म प्रोडक्शन ही निर्मिती संस्था असल्याचे या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर

पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू

पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...

सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
