Satara Landslide | आंबेघरमध्ये दरड कोसळून 35 तास उलटूनही प्रशासनाची मदत पोहचली नाही
साताऱ्याच्या आंबेघरमध्ये अजूनही मदत मिळालेली नाहीय. अनेक लोकं आणखीही मदतीविना आहेत. घटनेला 35 तास उलटूनही त्यांच्यापर्यंत आणखीही मदत मिळाली नाहीय.
साताऱ्याच्या आंबेघरमध्ये अजूनही मदत मिळालेली नाहीय. अनेक लोकं आणखीही मदतीविना आहेत. घटनेला 35 तास उलटूनही त्यांच्यापर्यंत आणखीही मदत मिळाली नाहीय. स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. टीव्ही 9 ची टीम तिथे पोहोचली आहे. तिथे गेल्यानंतर प्रशासनाची टीम आणखीही पोहोचली नसल्याचं समोर आलंय. प्रशासन जरी पोहोचलं नसलं तरी स्थानिकांनी बचावकार्य सुरु ठेवलं आहे. लवकरात लवकर मदत पोहोचती आहे, असं उत्तर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलं आहे.
Published on: Jul 24, 2021 11:23 AM
Latest Videos