वर्सोवा समुद्रात बोट उलटली, मासेमारीसाठी मच्छिमार खोल समुद्रात गेले, अन्…
VIDEO | वर्सोवा समुद्रात बोट उलटली, बेपत्ता असलेल्या मच्छिमारांना शोधण्यासाठी हेलिकॅप्टरची मदत, नेमकं काय घडलं?
मुंबई, ७ ऑगस्ट २०२३ | मुंबईच्या वर्सोवा समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या दोन मच्छिमारांची बोट उलटल्याने समुद्रात बुडाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परवा रात्री ९ वाजता ३ मच्छिमार बोटीने समुद्रात मासेमारीसाठी गेले होते, तेव्हा अचानक त्यांची बोट उलटली आणि तिन्ही मच्छीमार समुद्रात बुडाले. तिघांपैकी एक मच्छीमार पोहत बाहेर आला असून, बोटीसह दोन जण अद्याप ही बेपत्ता आहेत. बोटीसह बेपत्ता झालेल्या दोन्ही मच्छिमारांचा शोध सुरू आहे. लाईफ गार्ड, बीएमसी आणि कोस्ट गार्डचे पथक सतत शोध मोहीम राबवत आहेत. समुद्रात बुडालेल्या मच्छिमारांच्या शोध मोहिमेसाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली आहे, मात्र अद्याप पर्यंत या दोन्ही मच्छिमारांचा काहीही पत्ता लागलेला नाही आहे. उशेणी भंडारी आणि विनोद गोयल अशी बेपत्ता झालेल्या मच्छिमारांची नावे आहेत. दोन जण बेपत्ता असल्याने प्रशासनाने हेलिकॅप्टरचा वापर केला. त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हेलिकॅप्टर समुद्रावर घिरक्या घालत होता. पण, त्यांना त्या दोघांचा अद्याप पत्ता लागला नाही. लाईफ गार्ड, कोस्ट गार्डचे पथकही बेपत्ता असलेल्या मासेमारांचा शोध घेत आहेत.