पुण्यात मोठ्या राजकीय हालचाली, शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठक?
VIDEO | पुण्यातील आजच्या पवार काका-पुतण्यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक
पुणे, १२ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आलीये. पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे ही बैठक झाली. व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या घरी ही बैठक पार पडली. चोरडिया यांच्या घरातून आधी शरद पवार बाहेर पडले. तर अजित पवार यांचा गाड्यांचा ताफा आतमध्येच होता. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांनंतर आज प्रत्यक्षपणे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती? या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार हे स्वत: शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. अजित पवार यांच्या काकू प्रतिभा पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. त्यानंतर अजित पवार यांनी दोनवेळा शरद पवार यांची भेट घेतली होती. आणि आज ही पुण्यातील गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

