INDIA आघाडीच्या बैठकीवरून वार-पलटवार, नितेश राणे यांच्या ‘त्या’ टीकेवर कुणाचं प्रत्युत्तर, म्हणाले, ‘बाप बदलणारी कंपनी…’
VIDEO | INDIA आघाडीच्या बैठकीवरून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या 'त्या' टीकेला, ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी दिलं प्रत्युत्तर, काय म्हणाले बघा
सोलापूर, ३० ऑगस्ट २०२३ | मुंबईत होणाऱ्या दोन दिवसीय इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. ‘कितीही बैठका घेतल्या तरी नरेंद्र मोदी हेच सत्तेत येणार’, असं वक्तव्य नितेश राणे यांनी टीका केली आहे. यावेळी नितेश राणे उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबईतील इंडिया आघाडीच्या खालच्या शब्दात टीका केल्याचे पाहायला मिळाले. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेसचे आणि विरोधी पक्षाचे नेते मुंबईत येत आहेत. यावरून नितेश राणे म्हणाले, ‘इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेसचे आणि विरोधी पक्षाचे नेते मुंबईत येत आहेत. मातोश्रीची खरी मम्मी उद्या येतेय. तर संजय राऊत याने अनेक भाकीतं केली. त्यातील एकही भाकीत खर झालं नाही. अटक होण्याच्या भीतीने हे बोलत आहेत. संजय राऊत जेलमध्ये बसणार’, असं नितेश राणे म्हणाले. याला ठाकरे गटाच्या शरद कोळी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.