एक काळ असा होता जेव्हा.. धनंजय मुंडेंबाबत शरद पवारांची मिश्किल टिप्पणी
शेतकऱ्यांच्या चांदवड इथं झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहिले. शेतकरी संतापले असून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ आणि इतरांचाही निर्यातबंदीच्या निर्णयास विरोध आहे. यासंदर्भात दिल्लीत बैठकही आयोजित करण्यात आली आहे.
नाशिक : 11 डिसेंबर 2023 | देशभरात कांद्याचे भाव वाढत असून अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आणखी दर वाढू नयेत म्हणून केंद्र सरकारने निर्यातीवर बंदी घातली असून त्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन करून कांदा लिलाव बंद पाडले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार मैदानात उतरले आहेत. काही वेळापूर्वी ते मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको सुरु असलेल्या चांदवडमदील आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत कांद्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं. कृषी मंत्री धनंजय मुंडे मात्र भेट द्यायला तयार नाही, असा प्रश्न यावेळी शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. “एककाळ असा होता की त्यांना आणि त्यांच्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या हातात होता. पण आता ते सोडून गायब झाले आहेत आणि त्यामुळे आता मी त्यांच्याबद्दल काही करू शकत नाही.”