जयंत पाटील भाजपमध्ये जाणार? ईडीचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले शरद पवार?

जयंत पाटील भाजपमध्ये जाणार? ईडीचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले शरद पवार?

| Updated on: Aug 14, 2023 | 6:21 PM

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता, ईडीचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार?

मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस आल्याने जयंत पाटील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज जयंत पाटील यांच्या भाजप सोबत जाण्याच्या चर्चांसंदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारला असताना शरद पवार यांनी ईडीचा उल्लेख करत यावर प्रतिक्रिया दिली. ईडीची भिती घालून सहकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी शरद पवार यांनी केला. ते म्हणाले, ‘जयंत पाटील यांच्या बंधुंना ईडीची नोटीस आल्याचे मला समजले. सत्तेचा गैरवापर करुन काही पावलं टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांनाही अशा नोटीसा आल्या. त्यामुळे, ते भाजपासोबत जाऊन बसले. आज तोच प्रयत्न जयंतराव यांच्यासोबत करण्याची भूमिका घेतलेली दिसते. पण, मला खात्री आहे की, त्यांची भूमिका स्पष्ट आहे’, असे म्हणत जयंत पाटील हे आपल्यासोबतच असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

Published on: Aug 14, 2023 06:11 PM