Rohini Khadse Video : ‘बाईईईईई काय हा प्रकार, थोडं…, बिग बॉसमधील ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत रोहिणी खडसेंची चित्रा वाघांवर खोचक टीका
सभागृहात दिशा सालियन प्रकरणावरून विरोधक आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधताना दिसताय. अशातच सभागृहात काल ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलीचं जुंपली.
दिशा सालियन प्रकरणावरुन सभागृहात काल सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी पहायला मिळाली असून ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलीचं जुंपली. सभागृहात दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात प्रस्ताव सभागृहात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी आणला. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले. मात्र अनिल परब यांनी दिलेल्या उत्तरावरून चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्याचे दिसले. यावेळी चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली. ‘संजय राठोडला उध्दव ठाकरेंनी क्लीनचीट दिली. अनिल परब यांनी उध्दव ठाकरेंना विचारावं. चित्रा वाघ तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते’, असे म्हणत हल्लाबोल केला. दरम्यान, चित्रा वाघ यांच्या सभागृहातील रौद्ररूपावरून विरोधक त्यांच्यावर निशाणा साधताय. अशातच पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर खोचक निशाणा साधलाय. ट्वीटवर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केलाय. ‘बाईईईईई काय हा प्रकार… थोडं थोडं साम्याच आहे, नाही ! पण कोणीतरी सांगा ते आपल्या राज्याचे ते सर्वोच्च सभागृह आहे.. बिग बॉसचा एखादा सीजन नाही!!’, असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
बाईईईईई काय हा प्रकार… थोडं थोडं साम्याच आहे, नाही ! पण कोणीतरी सांगा ते आपल्या राज्याचे ते सर्वोच्च सभागृह आहे.. बिग बॉसचा एखादा सीजन नाही!!#चित्रविचित्र #Maharashtra pic.twitter.com/QGYajJ7YXV
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 20, 2025