शरद पवार यांच्या ‘त्या’ एका वक्तव्यानं उडाली सर्वत्र खळबळ; म्हणाले, ‘लवकरच नवा इतिहास…’
मी ८३ वर्षाचा झालो, ८४ वर्षाचा झालो, असे म्हणतात. तुम्ही माझ काय बघितलं अजून, मी काही म्हातारा झालो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद अजून माझ्यात आहे. तुम्ही काही चिंता करु नका, असे म्हणत शरद पवार यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला
पुणे, १७ डिसेंबर २०२३ : खेड तालुक्यात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साहेब केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी एक वक्तव्य केले ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार म्हणाले, मी ८३ वर्षाचा झालो, ८४ वर्षाचा झालो, असे म्हणतात. तुम्ही माझ काय बघितलं अजून, मी काही म्हातारा झालो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद अजून माझ्यात आहे. तुम्ही काही चिंता करु नका, असे म्हणत शरद पवार यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला आहे तर जे काही तुमचं दुखणं आहे ते लवकरच दूर करु, यासाठी जे काही करावे लागेल, ते सर्व आपण एकत्र मिळून करु. लवकरच नवा इतिहास घडवू, अशा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त करत नवा संकेत दिला असल्याने सर्वत्र शरद पवार यांच्या या एका वाक्यानं चर्चांना उधाण आलं आहे. या स्पर्धेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अमोल कोल्हे उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.