आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत शहाजी बापू पाटील म्हणतात…
मुंबईतील वरळीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेवर शहाजी बापू पाटील यांनी काय केलं भाष्य?
सोलापूर : दोन दिवसापूर्वी वरळी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली, या सभेला वरळीकरांनी पाठ फिरवल्याची टीका विरोधकांनी केली. यावर सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी असे सांगितले की, सभेला अपेक्षे एवढी गर्दी होती. परंतु आयोजकाला अजून जास्त अपेक्षा असेल त्यामुळे तसे वाटले. तसेच मुंबईत वरळी सारख्या भागात सभेला जास्त गर्दी होत नसते, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी वेळ मारून नेली. तसेच गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असल्यामुळे सर्वात मोठा पक्ष आता संपू लागला आहे, असे मतही आमदार शहाजीबापु पाटील यांनी व्यक्त केले आहे. तर आमदार बच्चू कडू हे जबाबदारीने बोलणारे व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे ते जे म्हणालेत काँग्रेसचे 25 आमदार फुटीच्या मार्गावर आहेत, तर फुटूही शकतात असे म्हणत आमदार फुटण्याच्या बातमीला दुजोरा दिला .