तो निष्ठांवत अन् कणखर, पित्याकडून मुलाचं कौतुक… गजानन किर्तीकर नेमकं काय म्हणाले? निवडणुकीनंतर इधर या उधर?
अमोल किर्तीकर निष्ठावंत असून तो ठाकरेंसबोत, त्याला शिंदेंनी विधानपरिषदेसह अनेक आमिष दिलीत पण तो कणखर होता. असं म्हणत शिंदेंच्या नेत्यांनं ठाकरेंच्या उमेदवाराचं कौतुक केलंय. शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर दिल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांचे सूर काहिसे बदल्याचे दिसताय. अमोल किर्तीकर निष्ठावंत आहेत. अनेक अमिष दाखवूनही तो शिंदेंकडे गेला नाही, असं वक्तव्य गजानन किर्तीकर यांनी केलंय. दरम्यान, गजानन किर्तीकर यांनी स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर दिलाय. वडील गजानन किर्तीकर हे शिंदे गटात असून त्यांचे प्रचारक आहे. तर मुलगा अमोल किर्तीकर ठाकरेंचा उमेदवार असल्याने यामुळे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील लढत चर्तेत होती. दरम्यान, अमोल किर्तीकर निष्ठावंत असून तो ठाकरेंसबोत, त्याला शिंदेंनी विधानपरिषदेसह अनेक आमिष दिलीत पण तो कणखर होता. असं म्हणत शिंदेंच्या नेत्यांनं ठाकरेंच्या उमेदवाराचं कौतुक केलंय. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच टप्प्यात मतदान झालंय. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. नेमका हाच मुद्दा गजानन किर्तीकर यांनी उपस्थित करून संथ गतीने झालेल्या मतदानावर टीका केली. बघा काय केली अप्रत्यक्षपणे टीका…