शिंदे गटाच्या खासदारावर आयकरची कारवाई; प्रतिमा खराब करण्याचा डाव, भावना गवळी यांचा रोख कुणावर?
२०२२ मध्ये ईडीचा ससेमिरा नंतर शिवसेनेत फूट पडली. या फुटीनंतर शिंदे गटात प्रवेश आणि दीड वर्षांनी पुन्हा नोटीस आलीये. शिंदे गटाचे यवतमाळ वाशिम येथील खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आणि कारवाई केली
मुंबई, ८ जानेवारी २४ : शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थेचे सर्व खाते आयकर विभागाकडून गोठवण्यात आलेत. यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. २०२२ मध्ये ईडीचा ससेमिरा नंतर शिवसेनेत फूट पडली. या फुटीनंतर शिंदे गटात प्रवेश आणि दीड वर्षांनी पुन्हा नोटीस आलीये. शिंदे गटाचे यवतमाळ वाशिम येथील खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आणि कारवाई केली. त्यामुळे भावना गवळींसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. भावना गवळी यांची महिला उत्कर्ष प्रतिष्ठान नावाची संस्था आहे. यासंदर्भात २९ डिसेंबरला आयकर विभागाने गवळींना नोटीस पाठवली होती. तर ५ जानेवारीपर्यंत हजर राहून गवळींना बाजू मांडायला सांगितलेलं होतं. मात्र त्या स्वतः हजर न राहता प्रतिनिधीला पाठवून त्यांनी या नोटीसला उत्तर दिलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Jan 08, 2024 10:55 AM
Latest Videos