Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ताधारी-विरोधक महाभारतासारखे उभे ठाकलेत, मविआ नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर, शिवसेना नेते संजय राऊतांची टीका

सत्ताधारी-विरोधक महाभारतासारखे उभे ठाकलेत, मविआ नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर, शिवसेना नेते संजय राऊतांची टीका

| Updated on: Mar 14, 2022 | 11:06 AM

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलंय. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या ईडी सत्रावर भाष्य करताना केंद्र सरकारला लक्ष्य केलं. तपास यंत्रणांना महाराष्ट्रात टार्गेट दिलं आहे, असं संजय राऊतांनी म्हणत तपास यंत्रणांवरच प्रश्न उपस्थित केलाय. तर याचवेळी राऊतांनी राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह महाविकास आघाडीतील नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर असल्याचा खळबळजनक दावाही पत्रकार परिषदेत केला.

नवी दिल्ली :  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर (bjp) टीकास्त्र सोडलंय. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या ईडी सत्रावर भाष्य करताना केंद्र सरकारला लक्ष्य केलं. तपास यंत्रणांना महाराष्ट्रात टार्गेट दिलं आहे, असं संजय राऊतांनी म्हणत तपास यंत्रणांवरच प्रश्न उपस्थित केलाय. तर याचवेळी राऊतांनी राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह महाविकास आघाडीतील नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर असल्याचा खळबळजनक दावाही पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, भाजपनं विजय मिळवलेल्या उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या चार राज्यांतील विजयाचा उन्माद मांडून नये, असं सांगायलाही राऊत विसरले नाही. गोव्यात कोणताही पक्ष जिंकत नसतो. गोव्यात फक्त व्यक्ती जिंकते, असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही (PM Narendra Modi) टीका केलीय.

Published on: Mar 14, 2022 11:06 AM