KDMC | 8 दिवसात खड्ड्यांची डागडुजी केली नाही तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकू, कुणी भरला दम?
VIDEO | कल्याण डोंबिवलीमध्ये मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य पसरले आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये असणाऱ्या खड्ड्यांचा समस्येवरून आणि रस्त्यातील भल्या मोठ्या खड्ड्यांवरून केडीएमसी अधिकाऱ्यांना शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी दम भरला आहे.
ठाणे, ३० सप्टेंबर २०२३ | कल्याण डोंबिवलीमध्ये मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य पसरले असून गणेशोत्सव अगोदर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील खड्डे बुजवण्यात येथील असा दावा पालिका आयुक्तांकडून करण्यात आला होता. मात्र आयुक्तांच्या आदेशांना ठेकेदारांनी केराची टोपली दाखवली आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील खड्डे जसेच्या तसे असून येत्या पंधरा दिवसात नवरात्रीचा उत्सव साजरा होणार असून रस्त्याच्या खड्ड्याची परिस्थिती पाहता आता शिवसेना शिंदे गट देखील आक्रमक झाले आहे. इतकेच नाहीतर आठ दिवसात खड्डे भरले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही खड्ड्यात टाकू त्याचबरोबर ठेकेदारांना एक रुपयाचंही बिल काढलं तर त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.