सिंधुदुर्गमध्ये रंगणार 'शिवगर्जना' महानाट्य, जिवंत प्राण्यांचा असणार समावेश

सिंधुदुर्गमध्ये रंगणार ‘शिवगर्जना’ महानाट्य, जिवंत प्राण्यांचा असणार समावेश

| Updated on: Mar 07, 2023 | 5:50 PM

VIDEO | शिव छत्रपतींच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारे “शिवगर्जना" महानाट्य, बघा काय आहे वैशिष्ट्य

सिंधुदुर्ग : कुडाळ येथे शिव छत्रपतींच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारे “शिवगर्जना” हे महानाट्य सादर केले जाणार आहे. या नाटकात तब्बल ७०० हून अधिक कलाकार सहभागी होणार असून मोठा सेट उभारण्यात येणार आहे. स्टेजवर जिवंत हत्ती, घोडे व उंटांसह शिवकालीन रोमांचकारी दृश्ये लोकांना अनुभवता येणार आहेत. हे नाटक शिवप्रेमींना मोफत पाहायला मिळणार आहे. १७ व १८ मार्च रोजी कुडाळ येथे हे महानाट्य होत असून कोकणात पहिल्यांदाच सादर होणार आहे. या महानाट्यात स्थानिक २०० कलाकारांना सहभागी करून घेण्यात येणार असून सुमारे 70 हजार प्रेक्षकांसाठी आसन क्षमता उभारली जाणार आहे. विशाल सेवा फाऊंडेशन तर्फे या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Published on: Mar 07, 2023 05:50 PM