Abdul Sattar : ‘जास्त हुशार्या मारू नका, अडीच वर्षांनंतर मी…’; अब्दुल सत्तारांनी विरोधकांना दिला थेट इशारा
मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार यांचीही वर्णी लागली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अशातच 'अडीच वर्षांनंतर मी मंत्री म्हणून पुन्हा येईल', असं वक्तव्य शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केलंय. इतकंच नाही तर जास्त हुशाऱ्या मारू नका, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना सूचक इशाराच दिला आहे.
महायुती सरकारचे नुकतेच मंत्रिमंडळ विस्तार झाले. यावेळी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली तर काही वरिष्ठ बड्या नेत्याचा पत्ता कट झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार यांचीही वर्णी लागली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अशातच ‘अडीच वर्षांनंतर मी मंत्री म्हणून पुन्हा येईल’, असं वक्तव्य शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केलंय. इतकंच नाही तर जास्त हुशाऱ्या मारू नका, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना सूचक इशाराच दिला आहे. यावेळी अब्दुल सत्तार यांनी मी नाराज नसल्याचे स्पष्ट करत कार्यकर्त्यांनीही नाराज राहू नये, असे म्हटले आहे. एका मेळाव्यातील सभेत बोलताना सत्तार म्हणाले, ‘मी चौथ्यांदा विधानसभेत निवडून गेल्यानंतर सिल्लोडला मंत्रीपद मिळेल अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र ते मिळालं नाही. राज्यात सर्वच भागाचा समतोल साधावा लागतो. अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यामुळे आपल्याला मंत्री पदासाठी थांबावं लागलं आहे. त्यामुळे मी नाराज नाही आणि कार्यकर्त्यांनी नाराज राहू नये. तर जास्त हुशार्या मारू नका, मी अडीच वर्षानंतर मंत्री म्हणून मी पुन्हा येईल’, असा इशारा विरोधकांना अब्दुल सत्तार यांनी या सभेत दिला.