MPSC परीक्षा पास पण हाकतोय मेंढ्या, पण का? सोशल मीडियावर होतोय व्हिडीओ व्हायरल
VIDEO | MPSC ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन देखील यशस्वी तरुणावर मेंढ्या हाकण्याची का आली वेळ ? tv 9 मराठीसमोर मांडली यशस्वी तरूणानं कैफियत, MPSC परीक्षा पास झालेल्या एका तरुणाचा रानमळ्यात मेंढ्या चारतानाचा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल
नाशिक, २७ सप्टेंबर २०२३ | सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि सोशल मीडियामुळे कोण रातोरात स्टार होईल याचा काही नेम नाही. सध्या MPSC पास झालेल्या एका तरुणाचा मेंढ्या चारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. MPSC परीक्षेचा निकाल लागून दीड वर्षे झाले तरी अद्याप कोणतीही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे एका यशस्वी तरूणावर मेंढ्या राखण्याची वेळ आली आहे. जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंत्यांची परीक्षा उत्तीर्ण होऊनही तरूणाला मेंढ्या हाकाव्या लागताना व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग येथील श्रावण गांजे असं या तरूणाचं नाव असून सोशल मीडियावर त्याचा मेंढ्या हाकतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे चित्र समोर आले आहे. MPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक तरूण घरदार सोडून वर्षानुवर्षे तयारी करताना आपल्या आजूबाजूला दिसतात. त्या काळात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं, अक्षरशः जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. पण परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही हा संघर्ष संपत नसल्याचं चित्र आहे.