राजकीय कुरघोडीतून नैराश्य अन्…, निलेश राणे यांच्या निवृत्तीवर ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं भाष्य
VIDEO | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होणार असल्याची घोषणा आज केली. निलेश राणे यांच्या राज्याच्या सक्रीय राजकारणातून बाजूला होणार असल्याच्या घोषणेमुळे कोकणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ
सिंधुदुर्ग, २४ ऑक्टोबर २०२३ | माजी खासदार निलेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आणि यासंदर्भातील ट्वीट देखील त्यांनी केले आहे. मात्र अचानक सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचे कारण निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. ‘मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही’, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. निलेश राणे यांच्या निवृत्तीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केले आहे. निलेश राणे यांचा राजकीय संन्यास हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. राजकारणात कोणी कधी यावं आणि कधी बाहेर पडावं, हा प्रत्येकाचा निर्णय आहे. निलेश राणे यांनी हा निर्णय का घेतला याबाबत अजून मला काही माहिती नाही. या निर्णयाचा कोकणातल्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. पक्षांमधील राजकीय वादातून हा सारा प्रकार घडला असावा अशी शक्यता विनायक राऊत यांनी वर्तविली तर राजकीय कुरघोडीत नैराश्य आल्यामुळे निर्णय घेतला असावा असेही ते म्हणाले.