प्रवास करताना सावधान... सिंहगड घाट रस्त्यावर दरडीसोबत कोसळला 6 टनाचा भलामोठा दगड अन्...

प्रवास करताना सावधान… सिंहगड घाट रस्त्यावर दरडीसोबत कोसळला 6 टनाचा भलामोठा दगड अन्…

| Updated on: Jul 02, 2024 | 11:54 AM

सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील जगताप माची जवळ सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. त्यावेळी स्त्यावर कोणी नसल्याने सुदैवाने जिवितहानी टळली. दरडी संरक्षित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करुनही दरवर्षी पावसाळ्यात सिंहगड घाट रस्त्यावर दरडी कोसळत आहेत त्यामुळे पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार कायम

हजारो पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांची वर्दळ असलेल्या सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील जगताप माची जवळ सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सहा टन वजनाच्या महाकाय दगडासह दरड कोसळली. त्यावेळी रस्त्यावर कोणी नसल्याने सुदैवाने जिवितहानी टळली. दरडी संरक्षित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करुनही दरवर्षी पावसाळ्यात सिंहगड घाट रस्त्यावर दरडी कोसळत आहेत त्यामुळे पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार कायम आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात अशी मागणी मावळा जवान संघटनेने केली आहे. भरपावसात प्रयत्न करूनही जेसीबी मशीनलाही दगड बाजुला हटविता आला नाही. त्यामुळे वन विभागाने अखेर ब्रेकरच्या साह्याने महाकाय दगड फोडण्यास सुरुवात केली. चार तासांनंतर दुपारी दीड वाजता महाकाय दगड फोडण्यात यश आले. घाट रस्त्याच्या मधोमध महाकाय दगड आणि दरडीचा मलवा कोसळल्याने कल्याण, कोंढणपूर भागातून डोणजे, पुण्याकडे येणाऱ्या, जीप, दुधाचे टेम्पो आदी वाहने पहाटे पासून अडकून पडली होती.

Published on: Jul 02, 2024 11:54 AM