असं डोहाळे जेवण कधी पाहिलंय का? लाडक्या ‘सुंदरी’च्या डोहाळे जेवणाची राज्यभरात चर्चा
VIDEO | शेतात राबणाऱ्या मुक्या प्राण्याचं आणि शेतकऱ्याचं नातं बऱ्याचदा आपण बघतो. मात्र एका शेतकऱ्याने आपल्या गायीचे चक्क डोहाळे जेवणं घातल्याची चर्चा राज्यभरात होतेय. सोलापूरच्या एका शेतकऱ्याने आपल्या लाडक्या गायीच्या डोहाळे जेवणाचा अनोखा कार्यक्रम केलाय, बघा व्हिडीओ
सोलापूर, २ ऑक्टोबर २०२३ | शेतात राबणाऱ्या मुक्या प्राण्याचं आणि शेतकऱ्याचं नातं बऱ्याचदा समोर आलं आहे. मात्र एका शेतकऱ्याने आपल्या गायीचे चक्क डोहाळे जेवणं घातल्याची चर्चा सर्वत्र राज्यभरात होतेय. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्याने आपल्या लाडक्या सुंदरी या नावाच्या गायीचे डोहाळे जेवण घातले आहे. उमाकांत वेदपाठक या शेतकऱ्याने आपल्या घरी सुंदरी नामक गाईच्या नावाने डोहाळे जेवण घातले. मोहोळ तालुक्यातील बोपले गावामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुंदरी नावाच्या गाईला मेकअप करत, गायीच्या गळ्यात फुलाचे हार, शिंगाला हेंगुळ लावून बेगडे बसवण्यात आले.गायीच्या शिंगाला गोंडे बांधत पाठीवर रंगीबेरंगी कपडे टाकण्यात आली होती. यावेळी पाच सुवासिनींनी ओटी भरत गाईसमोर फळे ठेवली आणि गायीची पूजा केली. यावेळी उपस्थित सर्व पाहुणेमंडळी आणि ग्रामस्थांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.