Video : सोलापुरात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट होऊन अग्नितांडव! थोडक्यात मोठा अनर्थ टळला

Video : सोलापुरात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट होऊन अग्नितांडव! थोडक्यात मोठा अनर्थ टळला

| Updated on: Jun 04, 2022 | 10:03 AM

Solapur Cylinder Blast : आग आणखी पसरली असती तर शेजारील दुकानात ऑईल-डिझेलच्या डब्यांनी पेट घेण्याची भीती होती.

सोलापूर : सोलापुरात (Solapur Cyliner Blast) वेल्डिंग दुकानात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग (Solapur Fire News) लागली. या स्फोटामुळे शेजारील दोन ते तीन गाळे जळून खाक झालेत. सोलापूर (Solapur News) शहरातील निराळे वस्ती परिसरात ही घटना घडली. मध्यरात्री अडीच ते तीनच्या दरम्यान स्फोट होऊन आजूबाजूचे गाळे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट इतका भयंकर होता की आसपासच्या घराच्या काचा स्फोटाच्या आवाजाने फुटल्या. सुदैवाने अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट झाला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. स्थानिक नगरसेवक देवेंद्र कोठेंनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलासह प्रशासकीय यंत्रणा हलवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग आणखी पसरली असती तर शेजारील दुकानात ऑईल-डिझेलच्या डब्यांनी पेट घेण्याची भीती होती. या स्फोटात ऑक्सिजन सिलेंडरच्या टाकीचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाल्याचे पहायला मिळालंय. सुदैवाने या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.