Special Report | संजय राठोडांना क्लीनचिट देणारं पत्र!-TV9
मृत्यूचं कारण बदलून नव्यानं सांगण्यात आलं. head injury with injury to spine with alcohol intoxication. म्हणजेच दारुच्या नशेत डोक्याला , मणक्याला दुखापत. याचाच अर्थ तरुणीचा मृत्यू हा दारुच्या नशेत गंभीर दुखापतीनं झाला, असा पुणे पोलिसांनी निष्कर्ष काढला.
दीड वर्षांनंतर पुन्हा संजय राठोड चर्चेत आलेत..त्याचं कारण शिंदे गटाच्या कोट्यातून ते पुन्हा मंत्री झालेत…आणि या मंत्रिपदावरुन भाजपच्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर पुन्हा राठोड विरुद्ध चित्रा वाघ असा सामना सुरु झाला. ज्या तरुणीच्या आत्महत्येच्या आरोपात मंत्रिपद गमावावं लागलं होतं, त्या प्रकरणात पोलिसांकडून क्लीनचिट मिळाल्याचा दावा संजय राठोडांनी केला. संजय राठोड ज्या क्लीन चिटबद्दल बोलत आहेत…ते पोलिसांचं पत्रक TV9च्या हाती लागलंय. यात मृत पावलेल्या संबंधित तरुणीचं नाव आहे. पण कुठंही संजय राठोडांचं नाव नाही…आणि यात मृत्यूचं कारण बदललेलं आहे. मृत्यू समरी मध्ये दोन्ही ठिकाणी आत्महत्या अथवा अपघाती असं लिहिलंय.. तर आधीचं कारण हे, head injury with injury to spine organs preserved for chemical analysis and histopathological examination असं लिहिलंय. याचाच अर्थ डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. यानंतर मृत्यूचं कारण बदलून नव्यानं सांगण्यात आलं. head injury with injury to spine with alcohol intoxication. म्हणजेच दारुच्या नशेत डोक्याला , मणक्याला दुखापत. याचाच अर्थ तरुणीचा मृत्यू हा दारुच्या नशेत गंभीर दुखापतीनं झाला, असा पुणे पोलिसांनी निष्कर्ष काढला.
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर

