Special Report | सारंगखेड्यात ऑडी, बीएमडब्लूपेक्षाही घोडे महाग

Special Report | सारंगखेड्यात ऑडी, बीएमडब्लूपेक्षाही घोडे महाग

| Updated on: Dec 19, 2021 | 11:53 PM

देशभरात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारात 2 हजार घोडे दाखल झाले आहेत. मात्र, सध्या बाजारात चर्चा आहे ती युवराज, सुलतान, रुबी आणि मानसी यांच्या ऐटदार रुबाबाची. त्यांची चाल पाहण्यासाठी अनेक रसिक जीव कुरवंडी करून टाकतायत. त्यांची किंमत ऐकूण तर कोणालाही धक्काच बसेल.

घोड्याची किंमत ही त्याची उंची, रंग आणि चाल याच्यावर ठरत असते. घोडा जितका रुबाबदार तितकी त्याची किंमत जास्त. सारंगखेड्याचा घोडे बाजारात दाखल झालेल्या रुबीची किमत एक लाख नाही दोन लाख नाही, तर तब्बल 33 लाख आहे. आपल्याला प्रश्न पडला असेल याची किमत इतकी का…? सारंगखेड्याच्या घोडा बाजरात दाखल झालेल्या दोन हजार घोड्यामध्ये रुबी महाराणीप्रमाणे रुबाबदार आहे. तिची उंची 63 इंच आहे. चाल रुबाबदार आहे. ती मधुलिका परिवारातील आहे. तीची सेवा करण्यासाठी 24 तास 4 मजूर असतात. तिच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जाते. तिला दररोज 5 लिटर दूध, एक किलो गावराण तूप, चणाडाळ, गहू, बाजरीसोबत कोरडा आणि सुका चारा दिला जातो.

घोडे बाजारात चर्चा आहे, तो उज्जैनहून दाखल झालेला अवघ्या 32 महिन्यांच्या युवराजची. त्याची डौलदार चाल, उंची त्यातील शुभ लक्षणे आणि त्याचसोबत त्याचा किमतीमुळे. पांढराशुभ्र युवराज नुकरा जातीचा अश्व आहे. त्याचे कान मारवाड आहेत. त्यात त्याची उंची 65 इंच इतकी आहे. ती अजून वाढेल. त्यामुळे तो बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेतो. त्याची किंमत आहे 21 लाख इतकी आहे. त्याचा खुराकही तितकाच दमदार आहे. त्याच्या खाणपानावर विशेष लक्ष ठेवले जाते.