Special Report | ज्यांच्या भरवश्यानं यूक्रेननं दंड थोपटले, त्यांनीच यूक्रेनला पाठ दाखवली

Special Report | ज्यांच्या भरवश्यानं यूक्रेननं दंड थोपटले, त्यांनीच यूक्रेनला पाठ दाखवली

| Updated on: Mar 05, 2022 | 10:19 PM

ब्रिटिश मंत्र्याच्या हवाल्यानं पुतिन यांनी नाटोला धमकावलंय. त्यांनी सांगितलं की NATO युद्धात सहभागी होऊ शकतो. तर पुतिन म्हणाले की यूक्रेनला नो फ्लाईंग झोन घोषित करणं एकप्रकारे युद्ध पुकारणंच आहे. यापूर्वी नाटोने यूक्रेनला आपण नो फ्लाईन झोन घोषित करु शकतो असं म्हटलं होतं.

रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या 10 व्या दिवशी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी मोठं वक्तव्य केलंय. पुतिन यांनी पुन्हा एकदा आण्विक हल्लाची धमकी दिलीय. पुतिन यांनी ही धमकी महिला पायलटसोबत घेतलेल्या बैठकीवेळी दिली. पुतिन म्हणाले की, आमची न्यूक्लिअर फोर्स हाय अलर्टवर आहे. ब्रिटिश मंत्र्याच्या हवाल्यानं पुतिन यांनी नाटोला धमकावलंय. त्यांनी सांगितलं की NATO युद्धात सहभागी होऊ शकतो. तर पुतिन म्हणाले की यूक्रेनला नो फ्लाईंग झोन घोषित करणं एकप्रकारे युद्ध पुकारणंच आहे. यापूर्वी नाटोने यूक्रेनला आपण नो फ्लाईन झोन घोषित करु शकतो असं म्हटलं होतं.