Special Report | विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना सत्र न्यायालयाचा तातपुर्ता दिलासा
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयानं मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात सोमवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. सरकारी वकीलांनी अटकपूर्व जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी वेळ मागितलाय. प्रवीण दरेकरांविरोधात खोटी माहिती दिल्याबद्दल एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आणि याच प्रकरणात दरेकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबै बँक प्रकरणी गुन्हा दाखल असलेले प्रवीण दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणावर तातडीनं सुनावणी व्हावी यासाठी दरेकरांच्या वकिलांचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबै बँकेत संचालक पदाच्या निवडणुकीत स्वतःला मजूर म्हणून दाखवणं हे प्रवीण दरेकरांना चांगलंच महागात पडलेलं आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं दरेकरांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयानं याचिका फेटाळून लावत त्यांना मुंंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार दरेकरांनी सत्र न्यायालयात धाव घेतली.