Special Report | पीएम नरेंद्र मोदींनी स्वत:ला फरीर म्हणू नये !

| Updated on: Jan 02, 2022 | 10:52 PM

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोकमधून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या बुलेटप्रूफ गाडीची आणि तिच्या किंमतीची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळत आहे. नुकताच पंतप्रधानांच्या ताफ्यात एका नव्या गाडीचा समावेश करण्यात आला आहे. ही बुलेटप्रूफ गाडी असून संपूर्णपणे जर्मन बनावटीची ही कार आहे. हाच धागा पकडत संजय राऊतांनी पंतप्रधानांवर टीका केलीय.

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी घेतलेल्या कारवरून खोचक टोला लगावला आहे. “२८ डिसेंबर रोजी पंतप्रधानाांसाठी विकत घेतलेल्या १२ कोटींच्या नव्या मर्सिडीज कारची छायाचित्र माध्यमांनी छापली. स्वत: फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांच्या सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये”, असा टोला राऊतांनी लगावला आहे.