Kunal Kamra Video : फक्त एकनाथ शिंदेवरच जोक का? कुणाल कामराची वादानंतर TV9 मराठीकडे पहिली प्रतिक्रिया काय?
स्टॅडअप कॉमेडियन कुणाल कामरायाने यावरून नवीन वाद ओढवून घेतला आहे. यानंतर संतप्त शिवसैनिकांकडून कुणाल कामराच्या मुंबईतील स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. या वादानंतर कुणाल कामरा याने tv9 मराठी सोबत संवाद साधला.
‘मला तपासासाठी बोलवलं तर सहकार्य करेल’, असं स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने म्हटलंय. सुरू असलेल्या वादानंतर कुणाल कामरा याने tv9 मराठी सोबत संवाद साधला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एका विडंबानात्मक गाण्यातून कुणाल कामराने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. मात्र tv9 मराठी सोबत संवाद साधताना हा शो २ फेब्रुवारी रोजी रेकॉर्ड झाला आणि २३ मार्च रोजी प्रसारित करण्यात आल्याचे कुणाल कामरा याने म्हटले. या शोच्या मागे कोणत्या राजकीय पक्षाचा किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हात आहे का? असा सवाल कुणाल कामरा याला केला असता त्याने स्पष्ट म्हटलं मला कोणत्याही पक्षाची गरज नाही. एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते हे सगळ्यांना माहित आहे. यामध्ये कोणती नवी गोष्ट आहे? त्यांना योग्य वाटत नसल्याने त्यांनी गोष्टींची तोडफोड केली. आम्ही कॉमेडिअन आहोत. नवा स्टुडिओ उभारू, मशीन आणि खुर्च्या विकत आणू, असं त्याने म्हटलंय. तर दिशा सालियान प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी तुम्ही ही कॉमेडी पुढे आणली असा आरोप होतोय, असं विचारले असता कामराने चुकीचं असल्याचे म्हटलंय.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
