Kunal Kamra Video : शिंदेंवरील गाण्यामुळे वाद, कामराला शिवसैनिकांचा फोन अन् शिवीगाळ, ऑडिओ व्हायरल
कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर गाणे गायलं असून दिल तो पागल है चित्रपटातील भोलीसी सूरत या गाण्याच्या चालीवर कुणालने त्याचं विडंबनात्मक गीत गायलंय.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या एकनाथ शिंदे यांच्यावरील गाण्यावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी कुणाल कामराला फोन करून शिवसैनिकांनी शिवीगाळ केल्याचे सांगितले जात असून ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. फोनवर शिवसैनिकांना कुणाल कामरा याने मी सध्या तामिळनाडूत असल्याचे उत्तर दिलं आहे. दरम्यान, व्हायरल होणाऱ्या या ऑडिओची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही. दरम्यान, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या एका गाण्यावरून सध्या शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण असून आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटची मोठी तोडफोड केली आहे. या प्रकरणी चारही बाजूने कुणाल कामरावर टीकेची झोड उठली जात असताना तो माघार घेताना दिसत नाही. होणाऱ्या या वादानंतरही कुणालने ‘अपुन झुकेगा नही’ अशीच भूमिका घेतल्याचे त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसून येत आहे. तर तो सध्या मुंबईतून फरार झाल्याची माहिती आहे. कुणाल कामरा हा व्हायरल होणाऱ्या ऑडिओमध्ये तामिळनाडूत असल्याचे म्हणतो. मात्र कुणाल कामरा पाँडिचेरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. काल रात्री अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि खार पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?

देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र

'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
